11 August 2007

Hassa aani latha wha

एका ओंडक्यावर पाच बेडूक बसले होते. त्यातल्या चौघांनी पाण्यात उडी घ्यायचं ठरवलं. मग ओंडक्यावर किती बेडूक उरले? ... पाच. कसे काय? अहो, काहीतरी ठरवणं आणि खरोखरीच तसं करणं यात फरक असतो!!!! दक्षिण भारतीय मंडळी वर्णाने काळी का असतात? कारण ती सनस्क्रीन न लावता सदोदित सन टीव्ही, सूर्या टीव्ही, उदय टीव्ही पाहात असतात!!!!
तो फार सज्जन माणूस होता. त्याने कधी सुपारीच्या खांडाचेही व्यसन केले नाही. त्याने आयुष्यात एकही खोटा शब्द उच्चारला नाही. त्याने परस्त्रीकडे डोळा वर करून कधीही पाहिले नाही... ... तो मरण पावला, तेव्हा इन्शुरन्स कंपनीने क्लेम नाकारला... ... ते म्हणाले, 'जो जगलाच नाही, तो मेला कसा?!!!
ए सकिर्ट,' जाडजूड पुस्तकातून डोकं वर काढत मुन्नाभायने विचारलं, ''वो नॉर्थ पोल रहता है ना, उस पे जो भालू रहता है, उस को क्या बोलते है रे?'' डोकं खाजवत सकिर्ट म्हणाला, ''उसको क्या बोलने का भाई? बोल के फायदा भी क्या? इत्ते दूर उस को थोडेही सुनाई देगा?!!!''
जन्माला येताक्षणी बाळानं नर्सला विचारलं, ''एक्स्क्यूज मी! मोबाइल आहे का तुमच्याकडे?'' '' आहे रे बाळा! पण तुला कशाला हवाय?'' '' मी सुखरूप पोहोचलो म्हणून देवबाप्पाला मिस्ड कॉल द्यायला!!!'' ................................................................................. गुलाब हा नेहमीच गुलाब असतो भले तो सोन्याच्या कुंडीत फुलो नाहीतर उकिरड्यावर त्याचप्रमाणे तू माझा मित्र आहेस भले तू सेंट्रल जेलमध्ये असो नाहीतर मेंटल हॉस्पिटलात!!!
भिडे जाम अस्वस्थ होते. मटारची उसळ आणि श्ाीखंड या द्वैवाषिर्क 'मेजवानी'साठी मुलाला पाव किलो मटार आणायला सांगितले असताना त्याने ३०० ग्रॅम आणले होते. त्याला काटकसरीचं महत्त्व पटवून देण्यासाठी काय करावें, असा प्रश्ान् होता. तो त्यांनी मुलाला रानड्यांकडे पाठवून सोडवला. मुलगा रानड्यांकडे पोहोचला, तेव्हा रात्रीची वेळ होती. वीज वाचावी म्हणून दारावर बेल नव्हती. त्याने कडी वाजवली. निव्वळ एका पंचावर असलेल्या रानड्यांनी हातात उदबत्तीएवढी मेणबत्ती घेऊन दरवाजा उघडला. दोघे आत गेले, हॉलमध्ये बसले. रानड्यांनी मेणबत्ती विझवून टाकली. '' घरात अंधार का आहे, ते आलं का तुझ्या लक्षात?'' रानड्यांनी विचारलं. '' आलं. आवश्यकता नसताना वीज जाळून अपव्यय कशाला करायचा?'' मुलगाही 'भिडे'च होता ना! '' करेक्ट. आणि मेणबत्ती का विझवली ते कळलं?'' '' कळलं. नुसतं बोलायचंच आहे, काही पाहायचं नाही, तर कशाला जाळायची वीज!'' '' पुन्हा बरोबर! पण, तेवढंच नाही. आवश्यकता नसताना वापरून वस्तू झिजवूही नयेत अकारण. त्यामुळे, मेणबत्ती विझवल्यानंतर मी पंचाही सोडून बाजूला ठेवून दिला आहे घडी घालून!!!''
ब्रह्माज्ञान चुका सगळेच करतात. कुणी पाहात नसताना त्या करण्याची कला साधली पाहिजे. तुम्हाला आयुष्याची उजळ बाजू दिसत नसेल, तर किमान जी काळवंडलेली बाजू दिसते, ती तरी पॉलिश करून चकचकवा. नकार देणे ही कला असेल. पण, होकार देऊन काहीच न करणे, ही त्याहून मोठी कला आहे.
बाळू बिनडोक हा उर्मट सरकारी कर्मचारी होता (ही द्विरूक्ती होईल का?) एसईझेडच्या कायद्याखाली खासगी कंपन्यांना शेतकऱ्यांच्या जमिनी 'मिळवून' देण्याच्या कामावर सध्या त्याची नेमणूक होती. भैरू भिंताडेच्या शेताकडे जाणाऱ्या रस्त्यावरच त्याची भैरूशी गाठ पडली. '' या शेताचे मालक तूच आहेस का रे?'' बाळूनं दरडावूनच विचारलं. भैरू म्हणाला, ''हो. काही काम होतं का तुमचं?'' '' मला तुझ्या शेताची पाहणी करायचीये.'' '' ठीक आहे. करा. पण, तिकडे, त्या मळ्यात जाऊ नका बरं का!'' '' मला जिथे जायचं तिथे मी जाईन. मला अडवणारा तू कोण?'' बाळू भडकला आणि खिशातून आयकार्ड काढून भैरूच्या डोळ्यापुढे नाचवत म्हणाला, ''सरकारी अधिकारी आहे मी!'' मोठ्या तोऱ्यात बाळू, भैरूनं मनाई केलेल्या, मळ्यात शिरला आणि अवघ्या दोनच मिनिटांत जिवाच्या करारानं धापा टाकत धावत बाहेर पडला... त्याच्यामागे शिंगं रोखून भैरूचा तगडा ढवळ्या बैल धावत होता... दोघांमधलं अंतर क्षणाक्षणाला कमी होत होतं... ''वाचवा, वाचवा'', भैरूला पाहून बाळू केकाटला... भैरू म्हणाला, ''पावण्या, माझ्या बैलाला दाखव की रे तुझं सरकारी आयकार्ड!!!!''
आपत्तींची मालिका २००२ : दहशतवाद २००३ : पूर २००४ : त्सुनामी २००५ : भूकंप २००६ : जलप्रलय आणि आता २००७ : आप का सुरूर!!!
एका झाडावर पाच पक्षी बसलेले असतात. तिथे एक शिकारी येतो आणि गोळी झाडतो. एका पक्ष्याला गोळी लागते. तो खाली कोसळतो. गोळीबाराने घाबरून तीन पक्षी उडून जातात. एक पक्षी मात्र झाडावर तसाच बसून राहतो... ... का? ... अंगात मस्ती, दुसरं काय?
पुपुपा... अर्थात पुन्हा पुणेरी पाट्या - रिसेप्शन हे सार्वजनिक वाचनालय नाही. कामाशिवाय तेथे बसू नये. - या खोल्यांवर पैसा कामासाठी खर्च केला आहे, तुमच्या गप्पांसाठी नाही. - ही लिफ्ट अ ाहे, लोकल ट्रेन नाही. सुटली तरी चालेल. - ग्राहक देवो भव. तुमचा पगार यांच्या खिशातून येतो. कंपनी काही देत नाही. - गावच्या गप्पा घरी. - ही जागा तुमचे तीर्थरूप येऊन साफ करत नाहीत. तुम्ही चैतन्यकांडीचा (सिगारेट) वापर करत असाल, तर तिचं बूड विझवायला विसरू नका. कोपऱ्यांतले पॅन शोभेचे नाहीत. त्यांत थोटकं विझवा. - शांतता राखा. हे ऑफिस आहे, मंडई नाही. -( ही पाटी गुजरातीत भाषांतरित करून मुंबईच्या प्रत्येक लोकलमध्येही लावा यार कुणीतरी!) हळू बोला. आपले पूर्वज माकड असले, तरी आपण आता माणसे झाले आहोत
घर घ्यावं 'पाहून'! नवं घर घेताना तुमच्या इस्टेट एजंटकडून कधीही कानी पडू नयेत, अशी काही विधानं... छे छे! तुम्हाला कुणीतरी चुकीची माहिती दिलीये. तुमच्या बिल्डिंगचा फक्त मागचा भागच एका दफनभूमीवर उभारलाय! ........................................................................... अहो, एका बाथरूमच्या फ्लशमधून पाण्याऐवजी रक्ताचा फवारा येतो, इतक्या फुटकळ कारणासाठी हे घर भुतानं झपाटलेलं ठरवणार तुम्ही?!!! .................................................................................. हे पाहा! तुमच्या आधीच्या भाडेकरूनं अगदी स्पष्टपणे सांगितलंय की या घरातल्या माशा चावल्यावर फक्त दोन दोन इंचाचे फोड येतात. पू होऊन ते फुटतात चार दिवसांत. पण, त्या विषारी नाहीयेत अजिबात! ........................................................................................................................ अहो, मृत्यू प्रत्येक घरात होतो, या घरातही झाला. आणि सरकारी वकील तो खून होता, असं सिद्ध नाही करू शकले कोर्टात! ... आणि हो, तुमच्या शेजारीच हिमेश रेशमियाची म्युझिक रूम आहे!!!

0 comments: