12 March 2010

जे.जे.मध्ये नातलगबाजी!

सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमधील प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना धमक्या देण्याचे प्रकरण गाजत असतानाच यंदा कमर्शियल आर्टच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या कलाकृतींसाठी दिलेल्या बक्षिसांमध्ये नातलगबाजीच प्रभावी ठरल्याचा आरोप होत आहे. जागतिक दर्जाचे कलाकार घडवणारी संस्था म्हणून जे.जे.चा देशभरात बोलबाला असला, तरी गेल्या काही वर्षांत संस्थेत कलेच्या क्षेत्रात न शोभणारे राजकारण सुरू झाल्याने संस्थेच्या प्रतिमेला तडा जाऊ लागला आहे. दर वर्षीप्रमाणे यंदाही कमर्शियल आर्टच्या चौथ्या वर्षांत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांच्या चित्रांचे प्रदर्शन महाविद्यालयात भरविण्यात आले होते. कलात्मक व नावीन्याचा शोध घेणाऱ्या कलाकृती विद्यार्थ्यांनी सादर केल्या होत्या. उगवत्या कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी सुमारे दोन लाख रुपयांची बक्षिसे विद्यार्थ्यांना देण्यात आली. विद्यार्थ्यांच्या कलाकृतींचे मूल्यमापन करण्यासाठी जे तज्ज्ञ बोलावण्यात आले होते त्यातील एक जण खासगी वाहिनीतील अधिकारी, तर एकाची स्वत:ची जाहिरात कंपनी आहे. या परीक्षकांचे अत्यंत जवळचे आप्त स्पर्धक असल्याने त्यांच्यावरच बक्षिसांची खैरात झाल्याचा धक्कादायक व गंभीर आरोप काही पालकांनी केला आहे.पालकांच्या म्हणण्यानुसार, आजपर्यंत चांगल्या व गुणवंत विद्यार्थ्यांच्या कलेची कदर व्हावी, यासाठी विद्यार्थ्यांला तीनच्या वर बक्षिसे दिली जात नसत. अर्थात हा नियम नसला तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडावी हा हेतू त्यामागे होता. पण यावेळी मात्र चार ते पाच विद्यार्थ्यांमध्येच सर्व बक्षिसे वाटण्यात आली. नातेवाईकच परीक्षक असल्याने एका विद्यार्थ्यांला तब्बल १३, तर अन्य एका स्पर्धकाला ११ पारितोषिके देण्यात आली. दुसऱ्या एका विद्यार्थ्यांवर एकदम आठ बक्षिसांचा वर्षांव करण्यात आला.ठाणे, डोंबिवली, कल्याण परिसरातील अनेक विद्यार्थी जे.जे.मध्ये शिकत असून, त्यांच्या पालकांनी या नातेवाईकशाहीबद्दल तीव्र नाराजी ‘वृत्तान्त’कडे व्यक्त केली. ठाण्यातील सुवर्णा एकबोटे व वंदना धमाले यांनी तर यासंबंधी लेखी तक्रार महाविद्यालयाच्या डीनकडे केली आहे. विद्यार्थ्यांवर अन्याय करणारे असे प्रकार किमान यापुढे तरी नावाजलेल्या सरकारी महाविद्यालयांत घडू नयेत, एवढी अपेक्षाही या दोघींनी व्यक्त केली आहे. संस्थेचे डीन वाघमारे यांच्याशी वारंवार संपर्क साधला असता ते मीटिंगमध्ये व्यस्त असल्याचे त्यांच्या कार्यालयातून सांगण्यात आले. त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक मिळविण्याचा प्रयत्न केला असता, ‘सर कधीच मोबाइल वापरत नाहीत’, असे उत्तर त्यांच्या कार्यालयातून देण्यात आले.

10 comments:

littlenital said...

whats happening in our college? I heard even the stadard of work exhibited in final exhibitions has gone down.....

its very sad...
rather than just doing 75 years celebrations and alumni and all that they should first better the standards of education given in college....

Unknown said...

very true... i agree with Nits

rajesh said...

i agree with nusu.....

समीर said...

Abe saale logo...kuch nayi post daalo yaar...kitne din se yahi post hai

Kapil Bhagat said...

i agree with sam

rajesh said...

hahahahahahahahhah

rajesh said...

mi ajun tari same post var aahe............ :(

Kapil Bhagat said...

i agree with rajesh

Dipali said...

We just either agree or disagree....do we really have the fire in our belly?

rajesh said...

i m agree with dipali too..........