आज खूप दिवसांनी ब्लॉगवर काहीतरी लिहावसं वाटतंय...कदाचित त्याला कारणही तसच आहे.
१५ ऑगस्ट २००६...काही कारणानिमित्त आपण सगळे आपल्या जुन्या अड्ड्यावर भेटलो..अर्थात नित्तलच्या पार्ल्याच्या घरी...
गप्पा रंगल्या..गाणी झाली.. चहा, कॉफी, नाश्ता झाला.. कॉलेजच्या आठवणी निघाल्या आणि आता नेहमीच्या भेटी, गप्पा, गम्मत, मस्ती कमी होणार ..प्रत्येक जण आपापल्या पर्सनल लाईफ मध्ये बिझी होणार...याची जाणीव झाली....
त्यातूनच सगळ्यांशी एकत्रितपणे संवाद साधता येईल असं काही असावं..कदाचित... आपल्या ग्रूपचाच एखादा ब्लॉग असावा अशी कल्पना सुचली...
१8 ऑगस्ट २००६, "Always be Friends" नावाने ब्लॉग तयार झाला आणि त्याची पहिली पोस्ट पब्लिश झाली...
http://alwaysbefriends.blogspot.com/2006/08/here-we-go.html
आज त्या गोष्टीला बरोबर ४ वर्षे पूर्ण झाली... आत्तापर्यंत एकूण ५११ पोस्ट झाल्या..भरपूर कमेंट्स आले...प्लान झाले...चर्चा झाल्या..फोटो शेअर झाले...भांडणं झाली...रुसवे फुगवे निघाले..."good news" शेअर झाल्या.
सगळ्यांविषयी सगळं शेअर करता आलं.....ओर्कुट आणि फेसबुक असतानाही मात्र ब्लॉग वापरण्याची इच्छा कमी झाली नाही...
आता कदाचित पूर्वी सारखा नेहमी भेटणं होत नसेल...भटकणं होत नसेल,,,कट्ट्यावर बसून कटिंग पिणं होत नसेल पण ब्लॉग च्या निमित्ताने का होईना आपल्यातला प्रत्येक जण अजूनही एकमेकांच्या तितकाच जवळ आहे.
कोलेज नंतरही एकूण १२ वर्ष आपल्या सर्वांना एकत्र बांधून ठेवण्यात जेवढी आपली मैत्री महत्वाची आहे तितकाच हा ब्लॉग...आपला वर्चुअल कट्टाच !
आज पूर्वीच्या काही पोस्ट पुन्हा वाचाव्याशा वाटल्या..खूप गम्मत वाटली..भरूनही आलं...घडलेल्या सगळ्या गोष्टींची एक शोर्ट फिल्म डोळ्यासमोरून गेली....आणि खरंच...आपल्याला असे मित्र मिळाले म्हणून आपण खर्या अर्थाने तरुणाई जगलो याच समाधान वाटलं..
काही निवडक गमतीशीर पोस्ट च्या लिंक्स:
http://alwaysbefriends.blogspot.com/2006/08/aapli-mumbai-to-namma-bengaluru.html
http://alwaysbefriends.blogspot.com/2006/08/and-award-goes-to.html
http://alwaysbefriends.blogspot.com/2006/09/achanak.html
http://alwaysbefriends.blogspot.com/2006/11/rajeshbhai-ke-tarfse-soochna.html
http://alwaysbefriends.blogspot.com/2006/11/ovenfresh-thoughts.html
अजून खूप आहेत....गमतीशीर!
पुन्हा एकदा मैत्री ची १२ वर्ष आणि ब्लॉग ची ४ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल सर्वांना खूप खूप शुभेच्छा !!!
skip to main |
skip to sidebar
18 August 2010
About this blog
Though Miles may lie between us,
We are never far apart,
for friendship doesnt count miles,
its measured by the hearts!
We are never far apart,
for friendship doesnt count miles,
its measured by the hearts!
Pages
We Are
Labels
- About Noumann (3)
- From me and mahesh (1)
- Ganapati Bappa Moraya (1)
Powered by Blogger.


4 comments:
ek dirgha usasaa
1 aasa natte je aapan neevadla japla aani velo velli majboot kelle, blog var mhanna kivva bhetoon mhanna ek meekancha sukha dookhat eekatra aallo, he natta aasach raho heech eecha
Happy Blogging.... Always be friends!!! Hip Hip Hurrey.....
ho re kharokharach kapil..
EK DIRGHA USASAA..
mala nahi kahi express karta yet evadhe.
Thanks to sam to keep alive the blog and write such good things..
Post a Comment