23 December 2010

तो.ती.आणि थंडी..

आत्तापासून १० वर्षे पुढे. डिसेंबरचाच महिना. हवेत बोचरा गारवा. त्या दोघांची गाडी मध्येच कोणत्यातरी गावच्या रस्त्यावर बंद पडलेली. तेवढय़ात त्यांना दिसलेली कोपऱ्यातली एक चहाची टपरी. त्याने जवळपास तिला खेचतच तिथवर आणले. बोचणारी थंडी, हातात गरमागरम वाफाळता चहा, त्याचा एक मंद प्रसन्न करणारा असा दरवळ आणि..ती दोघं एकत्र..जुने दिवस न आठवतील तरच नवल.
काय फ्रेंडस, गेलात ना १० वर्षे पुढे?..अहो सध्याची थंडीच काही वेगळी आहे. नोव्हेंबर-डिसेंबर दरम्यान पडणारी ही थंडी तशी सगळ्यांनाच प्रिय. लहानांपासून मोठय़ांपर्यंत, सर्वाच्याच थंडीला असा एक वेगळा रंग असतो. मात्र तरुणाईच्या थंडीला असणारा रंग काही वेगळाच असतो..गुलाबी थंडी..प्रत्यक तरुणाने कधी ना कधी अनुभवलेली अशी थंडी. आजकाल प्रत्येक सकाळ ही काहीशी रेंगाळलेलीच असते. सकाळी सकाळी लवकर उठणे तर शीर्षांसनापेक्षाही अवघड गोष्ट वाटायला लागते. अन चुकूनमाकून जर लवकर उठून कॉलेजला गेलो आणि लेक्चरला बसलो तर म्हणजे ‘अरसिकपणाचा कळसच’. अनेक तरुणांच्या मते, बाहेर एवढी छान थंडी पडलेली असताना हातात वाफाळत्या चहाचा पेला घेण्याऐवजी पेन धरणे म्हणजे तर तरुण असण्याचाच अपमान. कारण अशा या बोचऱ्या थंडीत चहाचा पेला हा अमृततुल्य मानला जातो. मग अशा या अमृतरुपी पेयाचे ३-४ (किंवा त्याहुनही जास्त) पेले, तरुणांना ‘स्वर्गाहूनही  प्रिय’ असणाऱ्या टपरीवर किंवा कॅन्टीनमध्ये बसून रिचवले जातात. आत्ता कुठेतरी तरतरी येतेय असे वाटत असतानाच, अचानक समोरुन केसांची बट हळूच कानामागे दडवून, दोन्ही तळहात एकमेकांवर चोळून शोधक नजरेने सगळीकडे बघत ‘ती’ येते. आणि मग काय..सारे अवसानच गळून पडते. तिची ती भिरभिरती नजर ‘त्या’च्या मनाचा ठाव घेते. अचानक त्याच्या हाताला गरम चहाच्या गरम पेल्याचा चटका बसतो. ‘काय रे लक्ष कुठाय?’ नाईलाजाने का होईना त्याला आपल्या मित्रपरिवाराकडे लक्ष द्यावेच लागते. ‘अरे यार, या थंडीत मस्त दोन दिवस ट्रीपवर जाऊ. मस्त शेकोटी पेटवून एन्जॉय करु ना..’ कोणीतरी ट्रीपचे पिल्लू सोडते. सगळ्यांना कल्पना पसंत पडते आणि मग जणू काही आपण शेकोटीभोवतीच बसलो आहोत, अशा अविर्भवात सर्वजण वागायला लागतात आणि तिथून जाता जाता तो तिचा चोरटा कटाक्ष मिळवण्यात यशस्वी होतो.  थंडीतल्या या अशा  २ँ१३ & २६ी३ प्रेमकथा आपल्याला आजकाल अनेक कॉलेज कॅम्पसेस मध्ये पहासला मिळतील. बऱ्याचजणांना हिवाळा हा द मोस्ट रोमॅन्टीक सीझन वाटतो. म्हणूनच की काय १४ फेब्रुवारी हा दिवस प्रेम दिवस म्हणून साजरा केला जातो. खरेतर आपल्या तरुण प्रेमवीरांना बाराही महिने रोमॅन्टीक रहायला आवडते. पण थंडीची मजा काही औरच असते. तो.ती आणि थंडी.ती दोघे एकत्र असले की हवेतला गारठा कधी गारवा बनतो कळतच नाही. तो त्याचा हात तिच्या हातावर ठेवतो आणि अचानक तिच्या अंगावर रोमांच सरसरते. ‘काय गं, काय झाले?’ ‘अहं, काही नाही..थंडी वाजतेय’ थंडीचा असाही एक उपयोग..ही थंडी गुलाबी व्हायचे अजून एक कारण म्हणजे बाईकवरुन जाताना त्याला मुद्दाम ब्रेक मारण्याची गरजच उरत नाही. कारण हवेत वाढणारी थंडी आपसूकच त्या दोघांमधले अंतर कमी करते. या थंडीता परिणाम आपल्या गाण्याच्या टेस्टवर सुद्धा होतो बरं का. सकाळी ट्रेनमधून जाताना, विंडोसीटला बसून ‘पहली बार मोहोब्बत की है’ चे स्लो व्हर्जन किंवा ‘बोल ना हलके हलके’, ‘ही गुलाबी हवा’, ‘तेरी ओर’ सारख्या गाण्यांबरोबर थंडीचा पुरेपूर आस्वाद घेतला जातो. आणि मग शेकोटीभोवती प्रियंका आणि शाहिद ऐवजी ‘मी’ आणि तो किंवा मी आणि ‘ती’ आहे, असे स्वप्नांचे इमले बांधले जातात अन् बोचणारी ही थंडी अधिकच गुदगुल्या करुन जाते. हिवाळ्यातली सकाळ जेवढी रेंगाळलेली असते तेवढीच दुपार आल्हाददायक असते. त्यामुळे थंडीतली दुपार ही इतर वेळच्या दुपारींपेक्षा अधिक रोमॅन्टीक असते. त्यामुळे मग अशा या दुपारीत प्रेमवीरांना आसरा असतो तो कॉफी शॉप्सचा..(तसा तो बाराही महिने असतो म्हणा.) बाहेर मस्त गार वारा, हातात गरम कॅपेचिनोचा मग आणि त्या दोघांच्या नजरेचा चाललेला लपंडाव.ती तिची नजर सारखी चुकवत असते आणि त्याची नजर तिला शाोधत असते. रस्त्यावरुन चालताना या जगात इतर माणसेच नाहीत या भावनेने ती दोघे भारलेली असतात. संध्याकाळ होत जाते. ५-५.३० वाजताच अंधाराने आपले अधिराज्य गाजविण्यास सुरुवात केलेली असते. जसाजसा अंधार गडद होत जातो तसतशी थंडी सुद्धा आपले अस्तित्व अधिकच दाट करते. आपल्या दोन्ही हातांची घडी घालून ती चालू लागते. अन् अचानक त्याचा उबदार हात तिच्या खांद्याभोवती विसावतो. काही क्षणांपुर्वी बोचरी असणारी थंडी अचानक उबदार कशी झाली याचे कोडे तिचे तिलाच उलगडते. अन् ती सुद्धा त्या उबदार स्पर्शाने काहीशी सैलावते. आणि मग काय..तो तर या क्षणासाठी ‘साष्टांग नमस्कार’ घालायचाच बाकी असतो.
थोडक्यात काय तर ही थंडी म्हणजे उन्हाळा आणि पावसाळा यांचे एक अनोखे मिश्रण असते.  उन्हाळ्यातला स्वच्छ, लख्खपणा आणि पावसाळ्यातला मस्त प्रसन्न गारवा यांचे..हिवाळा मुळात येतोच हे सांगायला की, आयुष्यात तुम्हाला बघाव्या लागणाऱ्या उन्हाळा पावसाळांवर फुंकर घालायलाच मी येतो. तर फ्रेंड्स थंडीच्या या लाटेवर स्वार व्हा आणि एक शीतल गारेगार हिवाळा सदैव मनाच्या कप्प्यात जपून ठेवा. एन्जॉय विंटर.

8 comments:

littlenital said...

hey who has written this?

nice write up......
so many things he said are so true.
Its amazing to feel the warmth in the arms of your beloved anytime.
but this season does add some magic to it.... ;)

I hope atleast this write up manages to make the BIG and clear messege reach all of us..
"Enjoy Winter"
guys, LETS GO SOMEWHERE.....

समीर said...

Atleast koi to zinda hai yaha

shardul said...

hmmmmm kharra aahe re baba te gammat kahi auurach

Kapil Bhagat said...

zinda ahet pan garathlet

rajesh said...

i m agree with kaps

समीर said...

Rajesh tuzi thandi ghalvaayche upaay aahet mazyakade....Bhet mala 31st Dec la..

Unknown said...

Wow... never read anything better about romantic, enjoyable winter! thanks Sam... it's really awesome just to think that we have so many things to enjoy nut just ignore... THANKS FOR REMINDING ONCE AGAIN!

ENJOY THANDI... with a hot cuppa

समीर said...

One more winter... just with a hot cuppa!